Adipurush | श्रीरामांना भेटायला आले बजरंग बली! ‘आदिपुरुष’च्या चालू शोमध्ये माकड घुसल्याच्या व्हिडिओ व्हायरल

Adipurush | मुंबई: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आदिपुरुष आज (16 जून) चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या दिवशी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. प्रत्येक चित्रपटगृहात एक सीट भगवान बजरंग बलीसाठी रिकामे  ठेवण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक थेटरमध्ये करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत … Read more

Published On: 

Adipurush | मुंबई: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आदिपुरुष आज (16 जून) चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या दिवशी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. प्रत्येक चित्रपटगृहात एक सीट भगवान बजरंग बलीसाठी रिकामे  ठेवण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक थेटरमध्ये करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

A monkey appears in the theater as Lord Sriram enters the film

आदिपुरुष (Adipurush) चित्रपट पाहायला गेलेल्या एका प्रेक्षकांनी चित्रपटगृहामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चक्क हनुमानरुपी माकड आदिपुरुष चित्रपट पाहायला आल्याचं दिसलं आहे. चित्रपटात प्रभू श्रीरामाची एन्ट्री होताच थेटरच्या खिडकीत एक माकड दिसलं आहे. या माकडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

चित्रपट (Adipurush)  बघण्यासाठी साक्षात हनुमान आले असल्याचं म्हटलं जात आहे. थेटरमध्ये माकड दिसतात प्रेक्षकांनी जय श्रीराम जय, श्रीराम गाणं म्हणायला सुरू केल्याचं या व्हिडियोमध्ये दिसत आहे. यासोबतच हैदराबादमधील एका चित्रपटगृहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हैदराबादमध्ये एका चित्रपटगृहत आदिपुरुष (Adipurush) सुरू होण्याआधी हनुमानाच्या राखीव खुर्चीवर बजरंग बलीचा फोटो ठेवून पूजा करण्यात आली आहे. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही