Job Opportunity | औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वरिष्ठ निवासी (Senior Resident) पदाच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले, तर अर्ज करणारा उमेदवार संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी (एमडी / एमएस / डीएनबी/ डिप्लोमा) धारक असावा. या भरती प्रक्रियेमध्ये वय वर्ष 45 पर्यंत असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना 500 रुपये फी स्वरूपात भरावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात. इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address to send application)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

अधिकृत वेबसाइट

https://www.gmcaurangabad.com/

जाहिरात पाहा

http://www.gmcaurangabad.com/download/Senior%20Resident%20Advertisement%20Dated%2013-2-2023.pdf

महत्वाच्या बातम्या