Sanjay Raut | “शिवरायांनी गद्दारांचा कोथळा काढल्याचं शिकलात तरी…” संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sanjay Raut | नाशिक : राज्यात गेल्या काही महिन्यात देव, साधूसंत आणि थोर महापुरुषांबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली गेली. त्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली. विरोधकांकडून टीका करण्यात आली. आंदोलने, निषेध केला गेला. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यभरात सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर राज्यपालांनी राजीनामा देण्याचे ठरवले. यावरुन शिवेसनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

“शिवरायांनी गद्दार आणि बेईमानांचा कोथळा काढला”

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना भाजपनेच अभय दिले. इतकेच नाही तर जाता-येताही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव येथिल सरकारने मंजूर केला. अशा मिंधे सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशिर्वाद कधीही लाभणार नाही. शिवप्रेमी त्यांना कधीही पाठिंबा देणार नाहीत. शिवरायांनी गद्दार आणि बेईमानांचा कोथळा काढला, हे जर तुम्ही शिवनेरीच्या पवित्र भूमीतून शिकून गेलात, तरी तुम्हाला शिवसेनेविषयीच्या बऱ्याच गोष्टी भविष्यात कळतील”, अशी टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली आहे.

“भाजपला शिवप्रेमी पाठिंबा देतील हा गैरसमज”

केंद्रीय मंत्री अमित शहा शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरीला येणार आहेत. याबाबत बोलताना संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “ते कुठेही गेलेत तरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद लाभणार नाहीत. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांना शेवटपर्यंत अभय देत त्यांनीच समर्थन केले. इतकेच नाही तर जाता-येताही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. अशा भाजपला महाराष्ट्रातील शिवप्रेमी पाठिंबा देतील हा भाजपचा गैरसमज आहे”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe