Shivsena | शिवसेना कोणाची? वाद कायम; सुनावणीमध्ये शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंचा युक्तीवाद

Shivsena | नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिंदे गटाकडून हरिश साळवे (Adv Harish Salave) आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज हरिश साळवे यांनी कपिल सिब्बल यांच्या मुद्द्यावर आक्षेप घेत जोरदार युक्तिवाद केला आहे. यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा मांडला आहे.

बहुमत चाचणी होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा का दिला ? याशिवाय विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणलेला असतांना ते आमदारांना निलंबित कसे करू शकतात? असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

आज शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी बाजू मांडल्यानंतर राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने सुनावणी स्थगित करण्यात आली. त्यामुळे सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यांच्या घटानापीठाकडून सात सदस्यांच्या घटनापीठाकडे जाईल का? याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा का दिला?

सत्तासंघर्षाच्या सुनावणीमध्ये वकिल हरिश साळवे यांच्या युक्तिवादानंतर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत हरिश साळवे यांच्या मुद्दे खोडून काढले होते. त्यानंतर आज पुन्हा हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला आहे. यामध्ये हरिश सावळे यांचा युक्तिवाद आजच्या दिवसातील सर्वात कळीचा मुद्दा राहीला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा का दिला? अध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव असताना अपात्रतेची कारवाई हे दोन मुद्दे प्रामुख्याने मांडण्यात आले आहेत.

राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच त्यांनी नबाम रेबिया प्रकरणावरही महत्वाचं भाष्य केलं. याबरोबरच सत्तासंघर्षाची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठापुढे घेण्यात यावी, अशी मागणीही ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. दरम्यान, आज पुन्हा याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. आज शिंदे गटाकडून त्यांची बाजू मांडण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.