Sanjay Raut | “पुण्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची परिक्षा, चांगल्या मार्काने पास होईल”

Sanjay Raut | नाशिक : पुणे शहरीतील कसबा आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक दौऱ्यावर असताना वक्तव्य केला आहे. “शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि आमचे इतर मित्र पक्ष या तिघांची आणि इतरांची मिळून जी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) झालेली आहे. पुण्यामध्ये (Pune Elections) त्याची परीक्षा असून या परीक्षेत महाविकास आघाडी नक्की उत्तीर्ण होईल आणि चांगल्या मार्काने पास होईल”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Raut talk about Pune by poll Election

“कसबा (Kasba Bypoll) आणि चिंचवड निवडणुकीत (Chinchwad Bypoll) भाजपची वाताहत झालेली दिसेल. नागपूर (Nagpur) आणि अमरावती ज्या पद्धतीने विधान परिषदेत भाजपचा पराभव झाला. त्याच पद्धतीने कसबा आणि चिंचवड निवडणुकीत होणार आहे. असच काहीस चित्र विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसून येणार आहे”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

“चांगल्या मार्काने पास होईल” (Sanjay Raut Criticize BJP)

“शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आमचे इतर मित्र पक्ष या तिघांची आणि इतरांची मिळून जी महाविकास आघाडी झालेली आहे. पुण्यामध्ये त्याची परीक्षा असून या परीक्षेत महाविकास आघाडी नक्की उत्तीर्ण होईल चांगल्या मार्काने पास होईल, असा विश्वास आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“भाजपने लोकांना कायम मतदारांना गृहित धरलं”

“अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये (Andheri Bypoll) तुम्ही पाहिलं असेल की, शिवसेनेचा मोठा विजय झाला. तिथे नोटाला (NOTA) भरपूर मतं मिळाली. अशी माहिती आहे की, लोकांच्या भावना आहेत. त्यानुसार या दोन्ही निवडणुकांमध्ये नोटांचे प्रमाण वाढू शकतं, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कायम मतदारांना गृहीत धरलं. पण आता वेळ निघून गेलेली आहे”, असे संजय राऊतांनी सांगितले आहे.

“भाजपला ते झटके सातत्याने मिळत आहेत”

“महाराष्ट्राच्या मतदारांना कालपर्यंत तुम्हीही गृहीत धरलं, पण आता ते शक्य नाही. कारण सातत्यानं भाजपला जे झटके मिळत आहेत, ते पाहिल्यावर लक्षात येईल की, मध्यमवर्गीय, सामान्य माणूस, शिक्षक, पदवीधर मतदार हा भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला संपवण्यासाठी जे कट कारस्थान रचले जात आहे. त्याविरुद्ध महाराष्ट्रातील जनता असून ती नक्कीच यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.