Sanjay Raut | “शरद पवारांनी ते कांड केलं असतं तर…”; फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीवरुन तुफान चर्चा रंगली आहे. 2019मध्ये राज्यात मोठी राजकीय घडामोड झाली. याबाबत काल सोमवारी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीच्या ‘व्हिजन महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनी या पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक दावे केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बोलताना ‘शरद पवारांच्या संमतीने पहाटेचा शपथविधी झाला’, असे म्हणाले आहेत. त्यावर आता शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांची प्रतिक्रिया

“अडीच वर्षांनंतरही देवेंद्र फडणवीस तेच सकाळचे स्वप्न पाहत आहेत. अजूनही ते झोपेतून उठले नाहीत. शपथविधी सोहळा होतोय, ते मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत, असे स्वप्न कधीपर्यंत पाहणार? हे दळण आणखी किती काळ दळत राहणार?”, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन केलेल्या दाव्यावर टीका केली आहे.

“भाजपने सर्वात आधी शिवसेनेशी विश्वासघात केला” (Sanjay Raut comment on BJP)

“अडीच-तीन वर्ष झाली आता त्या शपथविधीला. शरद पवार यांचा त्यात काहीही संबंध नाही. शरद पवारांनी ते कांड केले असते तर सरकार पाच वर्ष टिकले असते. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही आमदार भाजपला फोडता आला नाही. भाजपने सर्वात आधी शिवसेनेशी विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवार जर तुमच्या षडयंत्रात सामील असते, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने पाच वर्ष पूर्ण केले असते. शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के असून ते हाती घेतलेले काम पूर्ण करतात”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

“त्यांचा खोटारडेपणा आम्ही रोज उघड करु” -Sanjay Raut

“असं काही ठरलं नव्हतं, हे बोलण्याची हिंमत करु नका. असंच ठरलं होतं. हे तुमच्या तोंडून निघालेलं होतं. हॉटेल ब्लू सी मधील तुमचं वक्तव्य तुम्हीच तपासून पाहा. हे एक नंबरचे खोटारडे लोक आहेत. त्यांचा खोटारडेपणा आम्ही रोज उघड करु. जर असं काही ठरलं नव्हतं. तर मग उद्धव ठाकरेंना दिलेला वायदा मिंधे गटाच्या टेस्ट ट्यूब बेबी सोबत का पूर्ण करत आहात. त्यांना का मांडीवर बसवून त्यांचा पाळणा हलवत आहात. आता म्हणत आहात, आम्ही शिवसेनेशी युती केली, मग आम्ही कोण होतो?.”, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

“आमचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणणे ही महाविकास आघाडीची परंपरा नाही. मात्र त्यांनी असे काय केले, ज्यामुळे त्यांना अटक होण्याची भीती सतावत होती. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांनी मविआच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांचा फोन टॅप करुन ते सर्व ऐकत होते. हा गंभीर गुन्हा आहे. मविआ सरकार या प्रकरणाचा तपास करत होती. मात्र तेवढ्यात सरकार बदलले. फडणवीस सत्तेत आल्यानंतर आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास तुम्ही का होऊ दिला नाही. तुम्ही पाप केलं, म्हणूनच तुम्ही घाबरत आहात”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-