Share

Sanjay Raut | “फडणवीस जगातले दहावे आश्चर्य”; संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका

Sanjay Raut | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 साली 72 तासांचं सरकार स्थापन केले होते. पण, ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच हे सरकार स्थापन केल्याचा’ खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.

“फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य”

“शरद पवारांशी बोलून जर तो शपथविधी झाला असता, तर नक्कीच ते सरकार चाललं असतं. 72 तासांचं सरकार कोसळलं नसते. देवेंद्र फडणवीसांविषयी काय बोलायचं? अलिकडे त्यांची वक्तव्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य आहेत. आधीची आठ आश्चर्य जगात आहेत. दोन आश्चर्य दिल्लीत बसलेले आहेत. हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात आहे,” असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

“त्यांनीच विश्वासघात केलाय”

“अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्याचे आपण मान्य केले होते. फडणवीस यांनी ‘हॉटेल ब्लू सी’ मधील स्वत:चे वक्तव्य पाहावे. अमित शहांसमोर सत्तेचे वाटप पन्नास-पन्नास टक्के हा त्यांचा शब्द होता. त्यांनी विश्वासघात केल्यावर आता इतर कोणी सत्ता बनवताना विश्वासघात केला म्हणून गळा काढण्यात काय अर्थ आहे”, असंही संजय राऊत फडणवीस आणि भाजपवर टीका करताना म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Sanjay Raut | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 साली …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now