Prakash Ambedkar | “लग्न लावायचं गंगूशी अन् संसार करायचा सावित्रीशी”; शपथविधीवरुन आंबेडकरांची शरद पवारांवर जहरी टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | मुंबई : राज्यात 4 वर्षापुर्वी म्हणजेच 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया (Prakash Ambedkar Reaction)

“अजित पवारांनीही तिच भूमिका मांडली होती. मला एकट्याला कशाला दोष देत आहात, माझ्या पक्षाचा निर्णय होता. त्यामुळे आम्ही सांगत होतो, लग्न लावायचं गंगूशी आणि संसार करायचा सावित्रीशी… हे मांडलेलं खर ठरलं,” असा टोला प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लगावला आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया

“देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती.

देवेंद्र फडणवीसांचा दावा

“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-