MNS | “…म्हणून त्यांनी अजित पवारांना माघारी बोलवलं”; प्रकाश महाजनांची शरद पवारांवर बोचरी टीका

MNS | मुंबई : राज्यात 4 वर्षापुर्वी म्हणजेच 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मनसचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनीही या प्रकरणावर भाष्य करत टोलेबाजी केली आहे.

“…म्हणून अजित पवारांना माघारी बोलवलं”

“शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर 45 मिनिट बैठक झाली होती. शरद पवारांना अंधारात ठेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात, हे न पचण्यासारखं आणि न पटण्यासारखं आहे. अजित पवार शरद पवारांना न विचारता करतील, यावर कोणाही विश्वास ठेवणार नाही. ही घटना घडल्यानंतर शरद पवारांना वाटलं असेल, मी पावसात भिजून कमवलेले, या घटनेने जाऊ शकतं. म्हणून अजित पवारांना माघारी बोलवलं,” असा टोला प्रकाश महाजनांनी लगावला आहे.

“अजित पवार खरच गद्दार”

“अजित पवारांनी शरद पवारांना न विचारता देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली, तर ते गद्दार आहेत. अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी त्यांना माफी देऊन उपमुख्यमंत्री केलं नसतं”, असे प्रकाश महाजन म्हणाले आहेत.

“शपथविधीच्या आधी पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा झाली?”

“पहाटेचा शपथविधी होण्याआधी पंतप्रधान आणि शरद पवार यांच्यात 45 मिनिटं बैठक झाली, त्यात काय ठरलं? फडणवीस असा दावा करतात की पहाटेचा शपथविधी शरद पवारच्या सांगण्यावरून झाला. हे अजित पवारांचं बंड असेल तर शरद पवार यांनी अजित पवार यांना बोलावून उपमुख्यमंत्री पद, अर्थखातं का दिलं? अजितदादांची एक अतृप्त इच्छा गृहखात्याची होती. ती फक्त पूर्ण केली नाही”, असेही प्रकाश महाजन म्हणाले आहेत.

“सत्तेसाठी कुणीही कुणाबरोबरही”

“सत्तेसाठी कुणीही कुणाबरोबरही जाऊ शकतं. फडणवीस यांची अप्रकाशित मुलाखत जी नंतर प्रकाशित झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य आहे. राज्यपालांना पाठवण्याच्या पत्राचा मसूदा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला. म्हणजे हा मसूदा कुठे तरी ठरला होता. फडणवीस यांनी तो तयार केला”, असेही प्रकाश महाजन म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना प्रकाश महाजनांनी म्हणाले, “याचा अर्थ याच्यामागे काहीतरी घडलं. ते घडलेलं सत्य जगासमोर येऊन नये, किंवा दोन व्यक्तीत झालेल्या गोष्टी कालांतराने पुढं आणणं योग्य नाही. असं शरद पवारांना सुचवायचं होतं”

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.