Supriya Sule | मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहे. मुंबईत वस्तीगृहात राहणाऱ्या एका मुलीची हत्या झाली आहे. तर चालू लोकलमध्ये महिला डब्यात एका तरुणानं मुलीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचं, सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
The government has become insensitive towards women – Supriya Sule
माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाला, “मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. सरकार महिलांबाबत असंवेदनशील झालं आहे.”
पुढे बोलताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, “सत्तेत असणारे मोठे नेते जाहिराती आणि बॅनरबाजीमध्ये अडकले आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कामं थांबली आहे.
“राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही महिलांबाबत संवेदनशील आहे. महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनांना राज्याचं गृहखात जबाबदार आहे. मी अजूनही लोकशाहीत जगते. त्यामुळे माझ्यावर टीका करण्याचा अधिकार इतरांना आहे”, असंही त्या (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- Adipurush | श्रीरामांना भेटायला आले बजरंग बली! ‘आदिपुरुष’च्या चालू शोमध्ये माकड घुसल्याच्या व्हिडिओ व्हायरल
- Sanjay Raut | फेविकॉल आहे की मधाचे चार थेंब, हे बघावं लागेल – संजय राऊत
- Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये तरुणीचा छळ करणाऱ्या नराधमानं केलं आणखी पाच महिलांसोबत गैरवर्तन
- Crime | धक्कादायक! वर्षभरापूर्वी झालेल्या वादामुळे मित्रांनीच केली मित्राची हत्या
- Sharad Pawar | गुलाबराव पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश? शरद पवारांसोबत प्रवास केल्यानं चर्चांना उधाण