FASTag | नवी दिल्ली: प्रवास करताना वाहनांना टोल नाका भरावा लागतो. टोल नाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा असतात. या समस्यांवर उपाय म्हणून भारत सरकारने टोलनाक्यांसाठी फास्टॅग लागू केला आहे. फास्टॅगच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन टोल भरू शकतात. मात्र, फास्टॅग नसल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
FASTag is mandatory for carrier owner
हायवे किंवा एक्सप्रेस हायवेवर गाडी चालवत असताना वाहक मालकासाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य आहे. फास्टॅग नसल्यास तुम्हाला दुप्पट रक्कम टोल म्हणून भरावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक वाहक मालकाने फास्टॅगचा वापर केला पाहिजे.
फास्टॅग (FASTag) करण्यासाठी तुम्ही http://www.fastag.org/apply-online या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही अर्ज करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून फास्टॅग रिचार्ज ही करू शकतात. यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या मदतीने फास्टॅग रिचार्ज करता येऊ शकते.
फास्टॅगच्या (FASTag) माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने टोल भरू शकतात. फास्टॅग एक इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन सिस्टीम आहे, त्यामुळे याच्या माध्यमातून तुम्ही सहज टोल भरू शकतात. फास्टॅग अधिकृत बँकेद्वारे भरला जाऊ शकतो. टोल नाक्यावर बसवलेल्या रीडर्स कारच्या विंडोज स्क्रीनवर असलेल्या स्कॅनरच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने टोल भरू शकतात. टोल भरल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमधून शुल्क कापला जातो.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | भाजप शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांची हकालपट्टी करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले
- Asaduddin Owaisi | “माझं मुघलांवर प्रेम…”; असदुद्दीन ओवैसी यांचं खळबळ जनक वक्तव्य
- Supriya Sule | मला आमची ही घराणेशाही मान्य आहे – सुप्रिया सुळे
- Warkari Lathi Charge । वारकऱ्यांवर लाठीमार करण्याची हिम्मत होतेच कशी? शिंदे – फडणवीसांचा हिंदुत्वाचा बुरखा टरा टरा फाटला
- Prakash Ambedkar | 2 गरोदर महिला अन् पोलिसांची क्रूर वागणूक; आळंदीमध्ये घडलेल्या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर संतापले