Crime | धक्कादायक! पैशासाठी डॉक्टरांनी विकलं नवजात लेकरू
Crime | नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशासाठी डॉक्टरांनी नवजात शिशुला विकल्याची घटना घडली आहे. बलात्कार झालेल्या एका पिढीत तरुणीला लेकरू झालं होतं. या बाळाला डॉक्टरांनी विकलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांना अटक केली आहे.
The doctor prepared a fake birth certificate and sold newborn
आशिक राशिद बराडे या आरोपी डॉक्टरांनी बनावटी डिलिव्हरी रेकॉर्ड आणि जन्मपत्र तयार करून या नवजात शिशुला विकलं आहे. या बाळाला जन्म देणारी आई बलात्कार (Crime) प्रकरणातील पीडित तरुणी आहे. 2017 ते 2022 यादरम्यान तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर ती तरुणी गर्भवती राहिली होती.
डॉ. आशिक बराडे यांच्या नर्सिंग होममध्ये तिने एका मुलीला जन्म दिला होता. मुलीची प्रकृती ठीक नाही, असं डॉक्टरनं पीडित तरुणीला सांगितलं होतं. त्यानंतर डॉ. आशिकनं खोटे रेकॉर्ड तयार करून बाळाला विकलं (Crime).
डॉ. आशिक यांनी केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच चौकशी करायला सुरुवात केली. पोलीस तपासामध्ये ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी लगेचच आशिक विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आणि त्याला अटक केली.
दरम्यान, नवजात शिशु विकण्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या मदतीने ही लोक हे कृत्य करतात, असं म्हटलं जातं. मात्र, सध्या घडलेल्या प्रकरणामध्ये डॉक्टरांनीच हे लज्जास्पद कृत्य (Crime) केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Love Jihad | मुस्लिम धर्म स्वीकारला नाही तर गोळ्या घालीन; 13 वर्षाच्या मुलीला इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकी
- Sharad Pawar | शरद पवारांना धमकी देणारा सौरभ करणार सुप्रिया सुळेंवर मानहानी दावा, म्हणाला…
- IND vs WI | वेस्टइंडीज दौऱ्यासाठी BCCI ची तयारी! रोहितसह ‘हे’ खेळाडू होणार संघातून बाहेर?
- Viral | 365 दिवसांपैकी 300 दिवस झोपलेली असते ‘ही’ व्यक्ती, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
- Chitra Wagh | लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल