Sharad Pawar | शरद पवारांना धमकी देणारा सौरभ करणार सुप्रिया सुळेंवर मानहानी दावा, म्हणाला…

Sharad Pawar | अमरावती: गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे-मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पोलीस तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामध्ये अमरावती येथील सौरभ पिंपळकर आणि पुणे शहरातील सागर बर्वे या दोघांची नावे समोर आली होती. सौरभ पिंपळकर याने माध्यमांसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे.

I have nothing to do with the Sharad Pawar threat case – Saurabh Pimpalkar

सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) म्हणाला, “शरद पवार (Sharad Pawar) यांना देण्यात आलेल्या धमकीशी माझं काहीच संबंध नाही. सोशल मीडियावर शेअर झालेलं ते ट्विट मी लाईक आणि शेअर सुद्धा केलं नव्हतं. तरीही सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत ते ट्विट माझ्या नावानं पोहोचलं आहे. माझं काही संबंध नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “मी औरंगजेबाचं ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये औरंगजेबाचं तोंड वाकडं होतं. यामध्ये मी कुठेही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. तरीही माझी बदनामी करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे मी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदींवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे.”

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरून धमकी देण्यात आली होती. पुण्यातील आयटी इंजिनिअर सागर बर्वे (Sagar Barve) नावाचा तरुण हे फेसबुक पेज चालवत असल्याची माहिती मिळाली होती. सागर बर्वे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.