Share

Aadhar Card | फ्री आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत वाढ! ‘या’ तारखेपर्यंत करून मिळेल फ्री आधार अपडेट

Aadhar Card | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख सर्व गोष्टी व्यवस्थित असणे खूप महत्त्वाचे आहे. फ्री आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 जून पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता विनामूल्य आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 14 सप्टेंबर 2023 पर्यंत … Read more

Published On: 

Aadhar Card | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख सर्व गोष्टी व्यवस्थित असणे खूप महत्त्वाचे आहे. फ्री आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 जून पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता विनामूल्य आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

14 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्ही विनामूल्य आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट करू शकतात. 14 सप्टेंबर पर्यंत तुम्ही आधार कार्डवरील नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी गोष्टींमध्ये विनामूल्य बदल करून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईलनंबर आवश्यक आहे.

आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट करत असताना तुमच्या लिंक मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही आधार कार्ड वरील माहितीत बदल करू शकतात.

How to Update Aadhar Card?

  • आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.
  • लॉग इनसाठी तुम्हाला https://uidai.gov.in/en/my-aadhaar/update-aadhaar.html या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करून ओटीपी टाकावा लागेल.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी डॉक्युमेंट सिलेक्ट करून व्हेरिफाय करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला ड्रॉप लिस्टमध्ये तुमचा आयडी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करावा लागेल.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.नंतर तुम्हाला विनंती क्रमांक मिळेल आणि आधार अपडेट फॉर्म सबमिट केला जाईल.
  • रिक्वेस्ट नंबरद्वारे तुम्ही तुमच्या आधार अपडेटची स्थिती जाणून घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही