IND vs WI | वेस्टइंडीज दौऱ्यासाठी BCCI ची तयारी! रोहितसह ‘हे’ खेळाडू होणार संघातून बाहेर?

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघ लवकरच वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघ वेस्टइंडीज विरुद्ध 02 कसोटी, 03 एकदिवसीय आणि 05 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआय 27 जून रोजी भारतीय संघाची घोषणा करणार आहे.

The senior players of Team India will be rested

मीडिया रिपोर्टनुसार, वेस्टइंडीज विरुद्ध (IND vs WI) होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेमध्ये टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा समावेश असू शकतो. मात्र, या दोन्ही खेळाडूंना वेस्टइंडीज दौऱ्यावर 02 सामन्याची कसोटी मालिका खेळता येणार आहे.

वेस्टइंडीज विरुद्ध (IND vs WI) होणाऱ्या सर्व मालिकांमध्ये गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. कामाच्या तणावामुळे या दोन्ही गोलंदाजाला वेस्टइंडीज दौऱ्यावर विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, वेस्टइंडीज विरूद्ध (IND vs WI) भारतीय संघ पहिला कसोटी सामना 22 जुलै ते 16 जुलै दरम्यान तर दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान खेळणार आहे. एक दिवसीय मालिकेतील 03 सामने अनुक्रमे 27 जुलै, 29 जुलै आणि 15 ऑगस्ट रोजी खेळले जाणार आहे. तर टी-20 मालिकेतील 05 सामने अनुक्रमे 4 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.