🕒 1 min read
Chitra Wagh | मुंबई: केंद्र सरकारने समान नागरी कायदा लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक वक्तव्य केलं आहे. सध्या मला दोन मुलं आहेत. पण मला अजून दोन-चार मुलं असतील तर मजा आली असती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल चित्र वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
Chitra Wagh Tweet on Supriya Sule
केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी अधिसूचना काढली
आणि
लगेच “मोठ्ठ्या ताई” नीं ४/४ मुलांचे समर्थन करायला सुरूवात केली @supriya_sule
लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय…??
केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी अधिसूचना काढली
आणि
लगेच “मोठ्ठ्या ताई” नीं ४/४ मुलांचे समर्थन करायला सुरूवात केली @supriya_sule
लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय…??
घरात जास्त मुलं असण ही फक्त मजा आणि आनंदाची बाब असू शकत नाही तर त्यांचे योग्य पालन होत त्यांना या देशाचे सजग व जबाबदार नागरीक बनवणे हे ही आपलं कर्तव्य…
४-४ अपत्यांचं समर्थन कशासाठी…??
एक राष्ट्र एक कायदा म्हणून देशात
#समाननागरीकायदा झालाच पाहीजे ..
सर्वांच्या सुरक्षेसाठी..देशाच्या प्रगतीसाठी हा कायदा गरजेचा असल्याचं विसरू नये
केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी अधिसूचना काढली
आणि
लगेच “मोठ्ठ्या ताई” नीं ४/४ मुलांचे समर्थन करायला सुरूवात केली @supriya_suleलोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय…??
घरात जास्त मुलं असण ही फक्त मजा आणि आनंदाची बाब असू… pic.twitter.com/lOiUe4jzzL
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 16, 2023
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सध्या मला दोन मुलं आहेत. माझी दोन्ही मुलं कॉलेजला जातात. ते कॉलेजला गेल्यावर मला वाटतं की अजून दोन-चार मुलं असते, तर किती मजा आली असती. ही एक भावनिक बाब आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहे – सुप्रिया सुळे
- Aadhar Card | फ्री आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत वाढ! ‘या’ तारखेपर्यंत करून मिळेल फ्री आधार अपडेट
- Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा झटका! ‘त्या’ वक्तव्यामुळे महाराजांवर गुन्हा दाखल
- Supriya Sule | शिंदे-फडणवीस सरकार महिलांबाबत असंवेदनशील- सुप्रिया सुळे
- Adipurush | श्रीरामांना भेटायला आले बजरंग बली! ‘आदिपुरुष’च्या चालू शोमध्ये माकड घुसल्याच्या व्हिडिओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










