Viral | राजस्थान: प्रत्येक व्यक्तीला आळस येत असतो. मात्र, काही लोक कितीही झोपले, तरी ते कायम कंटाळलेले आणि आळस देत असतात. सध्या राजस्थानच्या अशाच एका व्यक्तीची चर्चा सुरू आहे. हा व्यक्ती 365 दिवसांपैकी तब्बल 300 दिवस झोपलेली असते. या व्यक्तीच्या झोपेबाबत एक कारण समोर आलं आहे.
Purkharam has axis hypersomnia disease
राजस्थानमधील पुरखाराम नावाची ही व्यक्ती कायम झोपलेली (Viral) असते. राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातील भडवा गावातील ही व्यक्ती आहे. पुरखाराम 365 दिवसांपैकी 300 दिवस झोपलेले असतात. त्यांना अॅक्सिस हायपरसोमनिया (Axis hypersomnia) हा दुर्मिळ झोपेचा गंभीर आजार झाल्याची माहिती मिळाली आहे. या आजारामुळे ते कायम झोपेत असतात.
पुरखाराम यांच्या या आजारावर वैद्यकीय उपाय (Viral) करण्यात आले होते. मात्र, या उपायांचा काहीच फायदा झाला नाही. उलट औषधांचे सेवन केल्यानंतर त्यांना थकवा आणि डोकेदुखी सारख्या वेदनांना सामोरे जावे लागत होते.
दरम्यान, राजस्थानच्या पुरखाराम (Viral) यांच्या झोपेची तुलना रामायणातील कुंभकर्णाशी केली जाते. परंतु, पुरखाराम यांनी कुंभकर्णाला मागं सोडलं आहे. कुंभकर्ण सहा महिने झोपायचा. मात्र, पुरखाराम वर्षातील 365 दिवसांपैकी 300 दिवस झोपलेले असतात.
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल
- Supriya Sule | अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहे – सुप्रिया सुळे
- Aadhar Card | फ्री आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत वाढ! ‘या’ तारखेपर्यंत करून मिळेल फ्री आधार अपडेट
- Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा झटका! ‘त्या’ वक्तव्यामुळे महाराजांवर गुन्हा दाखल
- Supriya Sule | शिंदे-फडणवीस सरकार महिलांबाबत असंवेदनशील- सुप्रिया सुळे