Athwani Movie Poster | प्रेम जितकं जुनं होत जातं, तितकं मुरत जातं… ‘आठवणी’ चे पोस्टर रिलीज

Athwani Movie Poster | कौटुंबिक आणि भावनिक चित्रपटांना मराठी प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम देत आले आहेत. यामुळेच दिग्दर्शक सिद्धांत सावंत आपल्यासमोर असाच एक खास चित्रपट घेऊन सज्ज आहेत. ‘आठवणी’ असे या चित्रपटाचे नाव असून आज (ता. १३) त्याचे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरवरून असं लक्षात येतंय की, मराठी प्रेक्षकांसाठी अनेक दिवसांनंतर असा भावनिक आणि नात्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट येत आहे.

सिद्धांत सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरवरून त्याची प्रगल्भता लक्षात येते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या पोस्टरवर झळकत आहेत, तर त्यांच्यासोबत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर दिसत आहेत. याशिवाय अभिनेता निनाद सावंत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेल. नात्यांची गुंतागुंत, एकमेकांवर असलेलं निर्व्याज प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रती असलेली ओढ या पोस्टरमधून दिसून येते. त्यामुळे हा चित्रपटाचे कथानक नक्की काय असेल हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

Produced by: Siddhant Sawant, Ashok Sawant

Co-Produced by: Deepak Pandey

Directed By: Siddhant A Sawant

Direction Team: Dhanaraj Chandrakant, Swapnil Jain, Pranjali Sonavdekar, Kinjal Gite, Shweta Upadhyay, Advait Phatak, Sanju Rathod

Story and Concept: Siddhant Sawant, Vidhi Sawant

Screenplay: Siddhant Sawant

Additional Screenplay and Dialogue: Ashwin Hatwalne

Starring: Dr. Mohan Agashe, Suhas Joshi, Suhrud Wardekar, Vaishnavi Karmarkar, Ninad Sawant, K. Kiran Rao, Utpreksha Suryakant, Prathmesh Deshpande, Tejas Jadhav, Atul Kawthalkar, Mahendra Chaudhari

Music: Suhit Abhyankar
Singer: Rohit Raut
Lyrics: Suhit Abhyankar
Music On: Zee Music Marathi

Poem: Valay Mulgand
Cinematography: Dhruv C Desai
Creative Director: Garima Anand
Executive Producer: Amit Soni
Production Designer: Nitin Borkar

Background Music: Sai-Piyush
Sound Designer: Suraj Bardia
Costume: Neetu Bharadwaj
Editor: Siddhant Sawant
Mixing Engineer: Yogesh Nehe, Akash Sen
DI Colorist: Vaibhav Waman (Prasad Lab)
Distribution: August Entertainment
Digital Coordinator: Digimagic Media (Anup Gore)
Publicity Designer: Vishnu Namdev
Account: Dharmesh Gosavi DG
PR: Proaktive
Digital Marketing: Its Social Time

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.