Sanjay Raut | मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका कृतीमुळे शिवसेना शिंदे गट (Shinde group) चांगलाच आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे शिवसैनिक संजय राऊत यांच्याविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Shinde group aggressive against Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या थुंकण्याच्या कृतीमुळे शिंदे गट आक्रमक झाल्याचं सांगितलं जात आहे. संजय राऊत यांना माध्यमांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या कृतीमुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे.
दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या कृतीमुळे त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या या वर्तनामुळे राज्यातील राजकारणात नवीन वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना-भाजप संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या कृत्यानंतर आक्रमक झाले आहे. हा वाद वाढल्यानंतर राऊतांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.”मी माझ्या घरात होतो. माझ्या जिभेला त्रास झाला म्हणून मी थुंकलो. मात्र, मी त्यांच्या नावाने थुकलो असं जर कोणाला वाटत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज
- Gas Cylinder | आनंदाची बातमी! गॅस सिलेंडरचे दर पुन्हा बदलले, जाणून घ्या किमती
- Thackeray Group | शिंदेंना मोठा झटका! शिंदेंना हरवण्यासाठी ठाकरेंनी मैदानात उतरवला ‘हा’ जुना शिलेदार
- WhatsApp | वापरकर्त्यांनो सावधान! व्हाट्सअप वापरताना ‘या’ लिंकवर क्लिक करणं ठरू शकतं धोकादायक
- Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?