Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Mumbai Airport | मुंबई: मुंबई शहरामध्ये दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात मुंबई एअरपोर्टवरून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई विमानतळावर एका महिन्याच्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा सगळीकडे पसरली आहे. या माहितीनंतर प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण समोर येतात सगळे हादरले आहे.

I have a bomb

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मूळची कोलकत्ता येथील रहिवासी आहे. विमानतळ (Mumbai Airport) परिसरात पोहोचल्यानंतर तिने माझ्याकडे बॉम्ब असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांनी या महिलेला अटक केली होती. मात्र, त्यानंतर जामिनावर तिची सुटका करण्यात आली.

ही महिला मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) कोलकत्याला जाणारी फ्लाईट पकडणार होती. या महिलेकडे तब्बल 22.5 किलो सामान असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, नियमानुसार तुम्ही विमानातून फक्त पंधरा किलो सामान मोफत नेऊ शकतात. त्या महिलेला सर्व सामना नेण्यासाठी जास्त पैसे भरावे लागणार होते. मात्र, ती पैसे भरण्यासाठी तयार नव्हती.

स्पाइड जेटच्या कर्मचाऱ्यांनी हाणामारी केल्याचा आरोप या महिलाने केला आहे. त्यानंतर अचानक तिने बॅगेत बॉम्ब असल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेच सीआयएसएफ घटनास्थळी (Mumbai Airport) पोहोचली. मात्र, तपास केल्यानंतर महिलेच्या बॅगेत काहीच संशयस्पद आढळलं नाही.

महत्वाच्या बातम्या