Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Asia World Cup | टीम महाराष्ट्र देशा: यंदा आशिया कप यजमान पदाचा अधिकार पाकिस्तानकडे आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भारतीय संघ (Indian team) आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर आशिया क्रिकेट परिषद (ACC) पाकिस्तानला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

ACC decided to host the Asia Cup in Srilanka

आगामी आशिया चषक स्पर्धा (Asia World Cup) पाकिस्तान ऐवजी श्रीलंकेमध्ये आयोजित करण्याचा निर्णय एसीसीने घेतला आहे. पाकिस्तान संघाशिवाय आशिया कप स्पर्धेचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर इतर संघ देखील पाकिस्तानशिवाय आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी तयार झाल्याचं दिसून आलं आहे. पाकिस्तानला या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल, तर त्यांना श्रीलंकेतच खेळावं लागेल.

पाकिस्तान संघाने हा पर्याय स्वीकारला नाही, तर संघाला आशिया चषक स्पर्धेतून (Asia World Cup) बाहेर राहावे लागेल. आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानच्या हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना श्रीलंकेमध्ये ही स्पर्धा खेळावी लागेल.

दरम्यान, आशिया चषक न खेळत (Asia World Cup) पाकिस्तान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसोबत तिरंगी मालिका खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान आशिया कपवर बहिष्कार टाकून तिरंगी मालिका खेळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

महत्वाच्या बातम्या