Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल

Maharashtra Board SSC 10th Result | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज 02 जून 2023  रोजी इयत्ता दहावीचा निकाल दुपारी 01 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. यंदाचा राज्याचा दहावीचा निकाल तब्बल 93.80% लागलेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी कमी आहे. गेल्या वर्षी राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला होता.

10th result is higher for girls than boys

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत हा निकाल (Maharashtra Board SSC 10th Result) जाहीर केला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात मुलींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला आहे.

कोकण विभागाचा सर्वात जास्त निकाल (Maharashtra Board SSC 10th Result) लागला आहे. कोकण विभागाचा तब्बल 98.11 टक्के दहावीचा निकाल लागला आहे. तर पुणे आणि मुंबई विभागाचा निकाल अनुक्रमे 95.64% आणि 93.66% लागला आहे.

10 वी चा निकाल कसा बघायचा? (How to check 10th result?)

  • दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम https://mahresult.nic.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांना होमपेजच्या Maharashtra Examination 2023 – RESULT या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • लिंक ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांना पुढील पानावर रोल नंबर आणि आईचं नाव प्रविष्ट करावं लागेल.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांना स्क्रीनवर निकाल दिसेल.
  • निकाल बघितल्यानंतर विद्यार्थी मार्कशीची प्रिंट घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या