Amol Mitkari | शिवराज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? अमोल मिटकरींचा राज्य सरकारला खडा सवाल

Amol Mitkari | रायगड: आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) किल्ले राजगडावर साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदी मान्यवर उपस्थित आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे.

Was the Shivrajyabhishek Sohala meant to promote Sanatan Dharma?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? असा खडा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

Amol Mitkari Tweet

छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं! तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल.

दरम्यान, ढोल ताशाच्या गजरात शिवभक्तांनी (Eknath Shinde) छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे. या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांनी गर्दी केली आहे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची राजेशाही मिरवणूक निघणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.