Gautami Patil | गौतमीच्या वडिलांना तिचा डान्स आवडतो का? उत्तर देत म्हणाले…

Gautami Patil | जळगाव: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. ती तिच्या डान्सने सर्वांना घायाळ करते. त्याचबरोबर तिच्या डान्समुळे तिच्यावर सातत्याने टीका होत असते. गौतमी अश्लील हावभाव करत डान्स करते, असा तिच्यावर आरोप केला जातो. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी देखील अनेकांकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गौतमीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली … Read more

Published On: 

Gautami Patil | जळगाव: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. ती तिच्या डान्सने सर्वांना घायाळ करते. त्याचबरोबर तिच्या डान्समुळे तिच्यावर सातत्याने टीका होत असते. गौतमी अश्लील हावभाव करत डान्स करते, असा तिच्यावर आरोप केला जातो. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी देखील अनेकांकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गौतमीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I love her dance – Gautami Patil Father

त्यांना गौतमीचा (Gautami Patil) डान्स आवडतो का? याबद्दल तिच्या वडिलांनी मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “माझ्या घरी टीव्ही नाही. दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये तिचा डान्स बघितला आहे. मला तिचा डान्स आवडतो. मात्र, मला थोडं वाईटही वाटतं. कारण तिच्या डान्सवर सातत्याने टीका होत असते.”

गौतमी (Gautami Patil) आणि तिचे वडील जवळपास 20 वर्षांपासून वेगळे राहतात. जळगाव जिल्ह्यातील वेळोदे गावात तिचे वडील रवींद्र बापूराव पाटील हे एकटेच राहतात.गावामध्ये तिच्या वडिलांचे पत्र्याचे घर आहे. हाताला मिळेल ते काम करून गौतमीचे वडील उदरनिर्वाह करतात.

Gautami Patil was educated in Pune

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) चा जन्म झाला तेव्हा आईला वडिलांपासून त्रास सुरूच होता. शेवटी नवऱ्याला कंटाळून गौतमीची आई तिला घेऊन मामाकडे पुण्याला जाऊन राहायला लागली. गौतमीचे शिक्षण पुण्यात झालं आहे. गौतमीच्या वडिलांचं दारूचं व्यसन दिवसेंदिवस वाढत होतं. त्यामुळे गौतमीने आणि तिच्या आईने त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही