Gautami Patil | पुणे: प्रसिद्ध नृत्यांगण गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला कोणत्याही ठिकाणी तुफान गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी नसते जेवढी गर्दी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला असते, असं विधान दिलीप मोहिते-पाटील यांनी केलं आहे.
Dilip Mohite-Patil criticizes Chief Minister Eknath Shinde
एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिलीप मोहिते-पाटील म्हणाले, “गौतमी (Gautami Patil) अत्यंत गरीब परिस्थितीतून आली आहे. ती तिच्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस अधिकारी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालतात. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी जमत नाही जेवढी तिच्या कार्यक्रमांना जमते.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “गौतमी ( Gautami Patil )ट्रोल होत आहे, हे मला माहित आहे. ती एक कलाकार आहे. ती एक नवीन कलाकार आहे. तिची कला थांबवू नका आणि त्याचबरोबर इतक्या लवकर तिचं आयुष्य संपवू नका, अशी माझी समाजाला विनंती आहे.
Gautami Patil Is A Actor – Dilip Mohite-Patil
दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पकालावधीतच आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिने क्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | राजकारणामध्ये पवारांच्या नादी कोणी लागू नका; रोहित पवारांचा विरोधकांना इशारा
- Dress Code In Temple | भाविकांसह पुजाऱ्यांना देखील ड्रेस कोड हवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
- Shinde Group | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार उद्धव ठाकरेंचा संपर्कात; ‘ही’ आहेत नावं
- Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचं भलं होणार नाही- महादेव जानकर
- BJP MLA | भाजप आमदार, पाप-पुण्य मोजायला गेले आणि खांबामध्ये अडकले