Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचं भलं होणार नाही- महादेव जानकर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaja Munde | दिल्ली: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर कार्यक्रमात नुकतचं एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मी भाजपची आहे. मात्र, भाजप पक्ष माझा नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख नेते महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या बहिणीच्या पक्षामुळे समाजाचं भलं होणार नाही, अशा खोचक शब्दात महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेवर टीका केली आहे.

Mahadev Jankar’s criticism to Pankaja Munde

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना जानकर म्हणाले, “माझी बहीण (Pankaja Munde) मुख्यमंत्री नक्कीच होणार. मात्र, त्यानंतर समाजाचं भलं होणार नाही. कारण रिमोट कंट्रोल वेगळा असेल आणि मालक वेगळा असेल.”

या कार्यक्रमामध्ये बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “माझा अर्ध लक्ष राष्ट्रीय समाज पक्षावर असतं. हे माझं माहेर आहे, माझ्या भावाचं घर आहे. घरी भांडण झालं तरी भावाच्या घरी मी जाऊ शकते. मागास वर्गाला पुढं आणायचं काम करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झाला आहे.”

Pankaja Munde becomes Chief Minister – Mahadev Jankar

दरम्यान, “मी भाजपची आहे. मात्र, भाजप पक्ष माझा नाही”, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहे.

महत्वाच्या बातम्या