Sanjay Raut | नेहमीचं रडगाणं सोडून पंकजा मुंडेंनी परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर कार्यक्रमात नुकतचं एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मी भाजपची आहे. मात्र, भाजप पक्ष माझा नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परिणामांची पर्वा … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर कार्यक्रमात नुकतचं एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मी भाजपची आहे. मात्र, भाजप पक्ष माझा नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परिणामांची पर्वा न करता पंकजा मुंडे यांनी धाडसाने निर्णय घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले आहे.

Sanjay Raut criticizes Pankaja Munde

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “माझ्यावर अन्याय होत आहे. या नेहमीच्या रडगाल्याला कोणी विचारत नाही. पंकजा मुंडे यांनी परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यायला हवा. भाजपमध्ये त्यांना कोणी मानत नाही म्हणूनच त्यांनी आज असं वक्तव्य केलं असावं.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी रक्ताचे पाणी केलं. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी शून्यातून भाजप निर्माण केला आहे. मात्र, आज महाराष्ट्रात आणि दिल्लीत मुंडे परिवाराचा अस्तित्व राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजप कुटुंबामध्ये आता मुंडे परिवाराविरोधात राजकारण सुरू आहे.”

Statement by Pankaja Munde

“मी भाजपची आहे. मात्र, भाजप पक्ष माझा नाही”, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही