Sanjay Raut | शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. महाविकास आघाडीच्या सरकारला लकवा मारला होता, अशी खोचक टीका सत्ताधारी पक्षाकडून केली जात होती. या टीकेला उत्तर देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात जाऊन पोहोचलं आहे, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Sanjay Raut criticizes Shinde-Fadnavis government

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे. त्यांचे कान, नाक, डोळे सर्व बंद आहे. त्याचबरोबर ते हालचाल देखील करत नाही. त्यांनी लकव्याच्या गोष्टी करू नये.”

पुढे बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नगरच्या नामांतराला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, “दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा काढून टाकण्यात आला होता. सत्ताधारी पक्षाने तो पुतळा हटवला. त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला होता. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो.”

“दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. या प्रश्नावर पंतप्रधानांनी भूमिका मांडली पाहिजे. महिला कुस्तीपटूंना न्याय मिळाला हवा, ही देशाची भावना आहे. मात्र, त्यांचा न्याय पंतप्रधान आणि केंद्र सरकार नाकारत आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या