Gautami Patil | कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील? तिचं मूळ गाव कोणतं? जाणून घ्या

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. गौतमी तिच्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. त्याचबरोबर ती तिच्या नृत्यामुळे अनेकदा वादात सापडते. गौतमी पाटील तिच्या आडनावावरून वादात सापडली होती. या वादाला खंबीर प्रतिक्रिया देत तिने पूर्णविराम दिला आहे.

Know about Gautami Patil’s Family and Life

जळगाव जिल्ह्यातील मुळची गौतमी पाटील (Gautami Patil) आहे. वेळोदे नावाचं तिचं गाव चोपडा तालुक्यात आहे. या गावांमध्ये तिचे वडील रवींद्र बाबूराम पाटील हे एकटेच राहतात. गावामध्ये तिच्या वडिलांचे पत्र्याचे घर आहे. हाताला मिळेल ते काम करून गौतमीचे वडील उदरनिर्वाह करतात. गौतमीच्या वडील दारूच्या अधीन गेलेले आहे.

गौतमी पाटील (Gautami Patil) चा जन्म झाला तेव्हा आईला वडिलांपासून त्रास सुरूच होता. शेवटी नवऱ्याला कंटाळून गौतमीची आई तिला घेऊन मामाकडे पुण्याला जाऊन राहायला लागली. गौतमीचे शिक्षण पुण्यात झालं आहे. गौतमीच्या वडिलांचं दारूचं व्यसन दिवसेंदिवस वाढत होतं. त्यामुळे गौतमीने आणि तिच्या आईने त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले. आता वेळोदे गावात गौतमीचे वडील एकटेच राहतात.

दरम्यान, गौतमीच्या ‘पाटील’ आडनावावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आडनावावरून टार्गेट करणाऱ्यांना गौतमीने पुन्हा एकदा चांगलंच सुनावलं आहे. यावेळी बोलत असताना तिने राजकारणात प्रवेश करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी (Gautami Patil) म्हणाली, “मला राजकारणातलं काही कळतं नाही. त्याचबरोबर मला त्यात काही इंटरेस्ट नाही. मी राजकारणात पडणार नाही.” ही प्रतिक्रिया दिल्यानंतर तिच्या राजकीय पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.