Sachin Tendulkar | मुंबई: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांना पदावरून हटवण्यात यावे यासाठी खेळाडू महिनाभरापासून आंदोलन करत आहे. यामध्ये साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह इतर खेळाडू सहभागी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंना पाठिंबा न दिल्याने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले आहे.
Congress put up a poster outside Sachin Tendulkar’s house
या पोस्टरच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) धरलेल्या मौनवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तुम्ही क्रीडा क्षेत्रातील देव आहात, पण तुम्ही महिला खेळाडूवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज का उठवत नाही? तुम्ही मूग गिळून गप्प का? असे सवाल या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहे.
भारतीय महिला खेळाडूंवर झालेल्या अत्याचाराबाबत निखिल वागळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक खेळाडू असून सचिन तेंडुलकरने कुस्तीवीर मुलींच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून निखिल वागळे यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे. लाज वाटते तू भारतरत्न असल्याची, असा घणाघात निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सचिन तेंडुलकरवर (Sachin Tendulkar) केला आहे.
दरम्यान, जंतरमंतर येथे 23 एप्रिलनंतर महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. 28 मे रोजी नवीन भवनाकडे कुच करत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलन स्थळावरून हटवले आणि त्यांना परत येण्यासाठी रोखले. मंगळवारी कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. मात्र, खाप पंचायत आणि शेतकरी नेत्यांनी समजूत काढल्यानंतर खेळाडू परतले.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात ‘या’ तारखेला हजेरी लावणार पाऊस
- Gautami Patil | कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील? तिचं मूळ गाव कोणतं? जाणून घ्या
- Shinde Group | ठाकरेंना मोठा झटका! मुंबईतील ‘या’ बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- Ravindra Jadeja | भारतीय संस्कृती जपणाऱ्या रवींद्र जडेजाच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहे का?
- Gautami Patil | “त्यात माझा काय दोष…”; आयोजकांवर गुन्हे दाखल प्रकरणी गौतमीची प्रतिक्रिया