Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात ‘या’ तारखेला हजेरी लावणार पाऊस

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मान्सून 2023 (Monsoon 2023) संबंधीत हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अंदमान-निकोबार बेटावर 19 मे पासून नैऋत्य मान्सूनचे वारे अडकले होते. या वाऱ्यांनी वेग धरलेला असून साधारण 15 जून पर्यंत देशातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दिनांक 22 ते 26 मे यादरम्यान मान्सून वारे अंदमान-निकोबार बेट ओलांडून बंगालच्या उपसागराकडे सरकायला हवे होते. मात्र, बदलत्या हवामानामुळे त्या गोष्टीला विलंब झाला. परंतु, आता मान्सून पुढे सरकला आहे.

Monsoon will arrive in the state on June 10

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), मान्सूनचा वेग पाहता तामिळनाडू आणि केरळमध्ये 01 जून ते 05 जून दरम्यान मान्सून हजेरी लागू शकते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 10 जून पर्यंत मान्सूनची येऊ शकतो. तर मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 जून पासून मान्सूनला सुरुवात होईल. राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरमध्ये 20 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे (Weather Update) राज्यातील काही ठिकाणी तापमानात घट झाली आहे. तर, काही ठिकाणी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये अंशतः भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), मुंबई, ठाणे आणि पालघर ही शहरं वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाणे, मुंबई आणि पालघरमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या