Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं सिंधी समाज आक्रमक; आव्हाडांनी माफी मागावी, अन्यथा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad | नाशिक: माजी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे सिंधी समाजाचा अपमान झाला असून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Jitendra Awhad’s offensive statement about the Sindhi community

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलत असताना आव्हाडांची जीभ घसरली आणि त्यांनी सिंधी समाजाला कुत्र्याची उपमा दिली. त्यानंतर सिंधी समाज आक्रमक झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सिंधी समाजाची लेखी मागणी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, त्यावेळी बोलत असताना त्यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सिंधी समाजाकडून त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला आहे.

दरम्यान, उल्हासनगर पाठोपाठ नाशिक सिंधी पंचायतीने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सिंधी समाजातर्फे नाशिकमध्ये गुन्हा दाखल व्हावा, यासाठी तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या