🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटाचे एकत्रिकरणावर मोठ्या चर्चा चालू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून होत असलेल्या व्यक्तव्यामुळे ही शक्यता अधिकच बळकट होत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवारसाहेब आले होते. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. सुख-दुःखात एकत्र असणं हे सामान्य आहे,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
Ajit Pawar on NCP Unity
ते पुढे म्हणाले, “आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत, पण कौटुंबिक नातं तसंच आहे. राजकारण एक बाजू आहे, पण घरातल्या कार्यक्रमांना एकत्र येणं स्वाभाविक आहे.”
सुप्रिया सुळे, रोहित पवार, आणि छगन भुजबळ यांनी उघडपणे दोन्ही गटांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. दुसरीकडे, शरद पवार यांना विचारले असता त्यांनी “मला काही माहिती नाही” असे उत्तर दिले होते. मात्र अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर या एकत्रिकरणाच्या शक्यतांवर पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादी एकत्रिकरणाला विरोध असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मी चक्रम आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही” – संजय शिरसाटांचा विरोधकांना इशारा
- केवळ ६७ कोटींना ११० कोटींचं हॉटेल? शिरसाट विरुद्ध राऊत सामना चिघळला!
- हाताला लकवा मारतो का? – लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर जोरदार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now