🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी: विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनी छत्रपती संभाजीनगर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर आज सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करत, विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
“मुलावर टीका झाली म्हणून मी त्याला या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडायला सांगणार आहे. पण विरोधकात दम असेल, तर त्यांनी हॉटेल खरेदी करून दाखवावं. मी तुमच्या स्वागताला येईन,” असं आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
Sanjay Shirsat hits back over VITS hotel auction
शिरसाट म्हणाले की, “विट्स हॉटेलसाठी सात वेळा लिलाव झाला पण कोणी घेतलं नाही. आठव्यांदा माझ्या मुलाने सहभाग घेतला. हॉटेलची किंमत ६७ कोटी ठरवण्यात आली, ती कोर्टाने ठरवली आहे. अजून व्यवहार पूर्णही झालेला नाही, तरीही आरोप सुरू आहेत.”
पुढे ते म्हणाले, “मी चक्रम आहे. घराला आग लावायलाही कमी करणार नाही. माझ्या नादी लागताना राजकारण करा, त्याला उत्तर देईन. पण कुटुंबावर बोलाल तर चोख प्रत्युत्तर देईन.”
📌 महत्वाच्या बातम्या
- केवळ ६७ कोटींना ११० कोटींचं हॉटेल? शिरसाट विरुद्ध राऊत सामना चिघळला!
- हाताला लकवा मारतो का? – लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर जोरदार टीका
- PBKS vs MI: पराभवानंतर कॅप्टन हार्दिकला अश्रू अनावर, मैदानात रडला! तर रोहितही निराश