Share

हाताला लकवा मारतो का? – लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर जोरदार टीका

OBC leader Laxman Hake hits out at Ajit Pawar, asking if he suffers paralysis while allocating funds. Also claims viral liquor photo is AI-generated.

Published On: 

OBC leader Laxman Hake hits out at Ajit Pawar, asking if he suffers paralysis while allocating funds. Also claims viral liquor photo is AI-generated.

🕒 1 min read

मुंबई – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा एकदा खरमरीत टीका केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी थेट प्रश्न विचारला, “आम्हाला ( ओबीसी ) निधी देताना अजितदादांच्या हाताला लकवा मारतो का?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला.

हाके म्हणाले, “आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागतो आहोत. एक वंचित समाज शिक्षणाच्या माध्यमातून उभा राहावा म्हणून प्रयत्न करतो आहे. पण अजित पवारांसारखे लोक आमच्यावर लक्ष न देता, गावात कोणी विचारत नाही अशी भुरटी माणसं आमच्यावर सोडतात.”

Laxman Hake criticizes Ajit Pawar over OBC fund

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा थेट माकड असा उल्लेख करत टीकेची धार अधिक तीव्र केली. “गावात न विचारली जाणारी माणसं आमच्यावर सोडताय, अशा भुरट्यांचा वापर का करताय?” असा खोचक सवाल त्यांनी केला.

मी दारू पितोय तुम्ही काय ‘मुत’ पिता का? राष्ट्रवादीच्या पक्षातले काय पिता? अजित पवारांचे दारुचे कारखाने आहेत, त्यांनी ते बंद करावेत, प्यायचा प्रश्न येतो कुठ? या सगळ्या फालतू गोष्टी असल्याचा उल्लेख हाके यांनी केला आहे.

लक्ष्मण हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर चालतो अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केली होती. यावर हाकेंनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, ”अजित पवार अमित शहांच्या ‘रिचार्ज’वर चालतात, ते विचार म्हणवं पहिले..!”

त्याचप्रमाणे, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोबाबत स्पष्टीकरण देताना हाके म्हणाले, “माझा दारूच्या बाटलीसोबतचा फोटो खोटा आहे, तो AI ने जनरेट केलेला आहे. अजितदादांनी आधी स्वतःचा दारूचा कारखाना बंद करावा, प्यायचा प्रश्नच येत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!