🕒 1 min read
गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या नात्यांबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. किरण राव आणि रीना दत्ता या दोन्ही पूर्व पत्नींसोबतचे नाते आजही घट्ट आहे, असंही त्याने स्पष्ट केलं.
‘We can’t be husband and wife…’: Aamir Khan
“गौरीशी माझी भेट अचानक झाली आणि मैत्रीतून आमच्या नात्याची सुरुवात झाली. मी आधी वाटत होतं की माझं वय झालं आहे आणि आता नव्याने प्रेम कोणावर करावं हेच कळत नव्हतं. पण तिच्याशी जुळलेलं नातं मला नकळत प्रेमापर्यंत घेऊन गेलं,” असं आमिर म्हणाला.
आमिरने हेही स्पष्ट केलं की, किरण आणि रीना या दोघीही आजही त्याच्या कुटुंबाचा भाग आहेत. “पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी आम्ही एकत्र येतो, दररोज बोलतो. आमचं नातं पती-पत्नीचं नसलं तरी आम्ही एकत्र कुटुंब आहोत,” असं तो म्हणाला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईची ‘ती’ सर्वात मोठी चूक, पंजाब किंग्स विजयी; IPL ट्रॉफीसाठी आरसीबीशी भिडणार!
- पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 204 धावांचं आव्हान 19 ओव्हरमध्ये पूर्ण करून इतिहास घडवला!
- पंजाब किंग्ज 11 वर्षानंतर IPL फायनलमध्ये, ट्रॉफीसाठी आरसीबीशी भिडणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now