🕒 1 min read
IPL 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत पोहचले आहे. आता पंजाब किंग्सचा सामना अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार असून यंदा नवा चॅम्पियन निश्चित होणार आहे, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत आयपीएलचा खिताब जिंकलेला नाही.
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ससमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं. पंजाबने सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये 2 विकेट्स गमावत 64 धावा केल्या. जोस इंग्लिसची विकेट पडल्यावर दडपण वाढलं. पण कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेराने 84 धावांची जबरदस्त भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
Punjab Kings reached IPL 2025 final
पंजाबच्या विजयाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता नेहल वढेराला मिळालेला अनपेक्षित जीवदान. नेहल 13 धावांवर होता आणि 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फटका मारत असताना ट्रेंट बोल्टच्या हातून झेल सुटला. आणि इथेच पंजाबच्या विजयाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
त्यानंतर नेहल वढेराने 29 चेंडूत 48 धावा करून संघाचा विजय सुलभ केला. त्याने श्रेयस अय्यरसोबत चांगली भागीदारी रचून मुंबईच्या गोलंदाजीला धुव्वा उडवला. या विजयासह पंजाब किंग्स आयपीएल इतिहासात 2014 नंतर फायनलमध्ये पोहोचली आहे. आता त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर अंतिम फेरीत मोठं आव्हान आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 204 धावांचं आव्हान 19 ओव्हरमध्ये पूर्ण करून इतिहास घडवला!
- पंजाब किंग्ज 11 वर्षानंतर IPL फायनलमध्ये, ट्रॉफीसाठी आरसीबीशी भिडणार
- PBKS vs MI : श्रेयस अय्यरची मॅचविनिंग खेळी, पंजाबची फायनलमध्ये धडक, मुंबईचा 5 विकेट्सने धुव्वा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








