केवळ ६७ कोटींना ११० कोटींचं हॉटेल? शिरसाट विरुद्ध राऊत सामना चिघळला!

Political clash between Sanjay Raut and Sanjay Shirsat over VITS Hotel deal. Shirsat defends son’s bid, Raut raises questions.

Published On: 

Political clash between Sanjay Raut and Sanjay Shirsat over VITS Hotel deal. Shirsat defends son’s bid, Raut raises questions.

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी: विट्स हॉटेलच्या खरेदीप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांच्या मुलावर झालेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हॉटेलची किंमत ११० कोटी असूनही केवळ ६७ कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने हे हॉटेल विकत घेतल्याचा आरोप केला होता. हॉटेलचा लिलावात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, राऊतांनी केला होता.

या आरोपाला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. “हॉटेलचा लिलाव कोर्टाच्या आदेशाने झाला. सात वेळा लिलावाची प्रक्रिया अपयशी ठरली होती. आठव्या वेळेला माझ्या मुलाने बोली लावली. व्हाईटमध्ये व्यवहार झालेला असून, २५ टक्के रक्कम महिन्यात भरावी लागते. इथे ब्लॅक अँड व्हाईटचा प्रश्नच नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Political clash between Sanjay Raut and Sanjay Shirsat

शिरसाट यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले की, “तुमचं लायकी नसल्यामुळे तुम्हाला बँक लोन देत नाही. दम असेल तर तुम्ही बोली लावा आणि हॉटेल घ्या. आरोप करण्यापूर्वी १० वेळा विचार करा.”

दरम्यान, संजय राऊत यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, “आम्ही फक्त प्रश्न विचारले आहेत. आरोप केलेले नाहीत. मराठी तरुणांनी उद्योगात यावं, ही आमची भूमिका आहे. पण सत्तेचा गैरवापर करून संपत्ती मिळवणे हे बेकायदेशीर आहे.”

राऊतांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला की, “शिरसाट मुंबईत ७२व्या माळ्यावर राहायला गेले, ते शिवसेनेमुळेच शक्य झालं. ग्रामीण भागातून आलेला एक तरुण तिथे पोहोचतो, याचा आम्हाला अभिमान आहे. पण हे यश कोणत्या आले, हे जनतेपुढे यायला हवं.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही