Shinde Group | मुंबई: राज्यातील ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि खासदार त्रस्त असून पक्ष सोडण्याचे मनस्थितीत आहे, अशी माहिती ठाकरे गटातील एका विश्वासुने दिली. शिंदे गटातील 22 आमदार आणि 09 खासदार आमच्या संपर्कात आहे, अशी माहिती ठाकरे गटाने दिली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
22 MLAs and 9 MPs from the Shinde group are in touch with Uddhav Thackeray
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आम्हाला (Shinde Group) तुच्छतेची वागणूक मिळत आहे. त्यामुळे आमची कामं होत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतः पक्षात स्थिर झाले आहे. मात्र, इतर कुणालाही पक्षात किंमत मिळत नसल्याची तक्रार आमदारांनी आणि खासदारांनी केली आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमची गळचेपी केली जात आहे, असा निरोप शंभूराज देसाई यांनी पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना पाठवला होता, असं देखील राऊत म्हणाले आहे.
तानाजी सावंत आणि गजानन कीर्तीकर यांनी देखील पक्षात (Shinde Group) असंतोष व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पातून पुरेसा निधी मिळत नसल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार खासदारांची कोंडी होत असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचं भलं होणार नाही- महादेव जानकर
- BJP MLA | भाजप आमदार, पाप-पुण्य मोजायला गेले आणि खांबामध्ये अडकले
- Sanjay Raut | नेहमीचं रडगाणं सोडून पंकजा मुंडेंनी परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यावा – संजय राऊत
- Gautami Patil | बीडच्या ‘त्या’ पाटलाला गौतमीचा निरोप; गौतमी पाटीलचा लग्नाला…
- Sanjay Raut | शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे – संजय राऊत