Sharad Pawar | ठाकरे परदेशात; पवार-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजतंय?

Sharad Pawar | मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शरद पवारांनी पहिल्यांदाच वर्ष बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं  आहे.

Meeting of Eknath Shinde and Sharad Pawar at Varsha Bungalow

शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री शिंदे भेटल्यानंतर जवळपास 35 मिनिटे चर्चा करत होते. त्यानंतर शरद पवार वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. मात्र, त्यांनी या भेटीबद्दल माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या परदेशी दौऱ्यावर गेलेले आहे. त्याचबरोबर सध्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू आहे. अशात शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळत चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे

ठाकरे गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे सचिन अहिर (Sachin Ahir) प्रतिक्रिया देताना म्हणाले, “शरद पवार हे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे गेले आहेत, ते एकनाथ शिंदेकडे गेलेले नाही. मात्र, ही भेट प्रशासकीय आहे की राजकीय आहे? या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, “सरकार जरी घटनाबाह्य असलं तरी प्रशासन चालवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहे. शरद पवार (Sharad Pawar) लोकांचे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असतील.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.