Share

सतत गैरहजर राहणाऱ्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा दणका; १ हजारांचा दंड आणि वॉरंटचा इशारा

२०१६ मधील एका खटल्यात सतत गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना १ हजारांचा दंड आणि वॉरंटचा इशारा दिला आहे.

Published On: 

Mumbai Mayor Ritu Tawde

मुंबई, 9 ऑक्टोबर: उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना कथित मारहाण केल्याप्रकरणी २०१६ मध्ये दाखल असलेल्या खटल्यात सतत गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाने त्यांच्यावर सततच्या अनुपस्थितीसाठी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करून त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्याचा इशारा दिला आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीलाही तावडे अनुपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या वकील दुर्गा राजपूत यांनी तावडे यांना वैयक्तिक उपस्थितीपासून कायमस्वरूपी सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला. रितू तावडे या मुंबईच्या प्रथम नागरिक असून पालिकेच्या विविध कार्यक्रमांमुळे त्यांचा दिवस अतिशय व्यस्त असतो, असा युक्तिवाद राजपूत यांनी केला. मात्र, सरकारी वकील इक्बाल सोळकर यांनी हा खटला आधीच सात वर्षे जुना असल्याचा मुद्दा मांडत कायमस्वरूपी सूट देण्याच्या अर्जाला कडाडून विरोध केला. यापूर्वीच्या सुनावणीतही तावडे यांच्या गैरहजेरीमुळे न्यायालयाने त्यांना ३०० रुपयांचा दंड ठोठावत बुधवारी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्या बुधवारी पुन्हा हजर न राहिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अखेर न्यायालयाने तावडे यांचा फक्त एका दिवसासाठी वैयक्तिक उपस्थितीपासून सूट देण्याचा अर्ज मान्य केला.

या प्रकरणात २०१७ मध्ये आरोपपत्र दाखल झाले असून, २०१९ मध्ये हे प्रकरण विद्यमान न्यायालयात वर्ग झाले आहे. यावर न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की, खटल्यात अद्याप आरोप निश्चित झालेले नसताना आरोपीची सततची अनुपस्थिती ही खटला लांबवण्याची प्रवृत्ती दर्शवते. आरोपीच्या सामाजिक स्थितीचा विचार करून सध्या अजामीनपात्र वॉरंट जारी केले जात नाही, परंतु खटल्याची सुनावणी जलद गतीने चालवण्यासाठी त्यांच्याकडून सहकार्य केले जाईल अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सतत गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने रितू तावडे यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करून वॉरंट जारी करण्याचा इशारा दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही