Thackeray Group | कल्याण: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा झटका दिला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख व माजी आमदार सुभाष भोईर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये भावी खासदार असे पोस्टर लावण्यात आले आहे.
Subhash Bhoir will contest election from Thackeray group
कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुभाष भोईर (Subhash Bhoir) तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद परांजपे (Anand Paranjape) निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातं आहे.
सुभाष भोईर यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवून जिंकली होती. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गटाचे (Thackeray Group) माजी आमदार सुभाष भोईर ग्रामीण भागात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाने या नेत्याला लोकसभा संपर्कप्रमुख हे पद दिले आहे.
दरम्यान, दोन गट तयार झाल्यानंतर सुभाष भोईर (Thackeray Group) यांना पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठाकरे गटाचा चेहरा म्हणून भोईर यांची ओळख आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या विश्वासूंपैकी भोईर एक आहे.
महत्वाच्या बातम्या
- WhatsApp | वापरकर्त्यांनो सावधान! व्हाट्सअप वापरताना ‘या’ लिंकवर क्लिक करणं ठरू शकतं धोकादायक
- Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
- Vajramuth | महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे; ‘या’ नेत्याची बोलताना जीभ घसरली
- Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?
- Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल