WhatsApp | वापरकर्त्यांनो सावधान! व्हाट्सअप वापरताना ‘या’ लिंकवर क्लिक करणं ठरू शकतं धोकादायक

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: व्हाट्सअप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय अॅप्लीकेशन आहे. जगभरातील लाखो लोक व्हाट्सअपचा वापर करतात. त्यामुळे कंपनी देखील वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेते. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवीन-नवीन फीचर्स लॉन्च करत असते.

A bug in WhatsApp is causing the Android app to crash

व्हाट्सअप (WhatsApp) वापरत असताना काही छोट्या-मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अँड्रॉइड ऑथोरिटीच्या रिपोर्टनुसार, व्हाट्सअपमधील बगमुळे अँड्रॉइड ॲप क्रॅश होत आहे. जेव्हा व्हाट्सअप वापरकर्ते wa.me/settings ही लिंक ओपन करतात तेव्हा हा बग ट्रिगर होऊ शकतो.

या लिंकवरून व्हाट्सअप (WhatsApp) सेटिंग पेज ओपन होते. मात्र, सध्या ही लिंक ओपन झाल्यावर अँड्रॉइड डिव्हाइसेस क्रॅश होत आहे. या बगमुळे व्हाट्सअप चॅट प्रभावित होत आहे. त्याचबरोबर ही लिंक ओपन केल्याने व्हाट्सअप क्रॅश होत आहे.

जर तुम्हीही अशा प्रकारच्या कोणत्या समस्येचा सामना करत असाल तर ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला व्हाट्सअप अपडेट करावे लागेल. कंपनीने हा बग दूर केला आहे. व्हाट्सअप (WhatsApp) अपडेट केल्यानंतर तुमच्या व्हाट्सअपला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

महत्वाच्या बातम्या