Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. राज्यात मान्सून (Monsoon) दाखल होण्याची शक्यता असताना उन्हाचा तडाका (Heat wave) वाढत चालला आहे. पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत चालला आहे. त्यामुळे मान्सूनसाठी आणखीन थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.

Heat wave forecast again in Vidarbha and West Maharashtra

विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि उपनगरात उष्णता वाढली आहे. तर तळ कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता आहे.

मराठवाडा, गोवा आणि कोकणमधील बहुतांश भागांमध्ये 04 जून रोजी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 05 जून रोजी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज (Weather Update) आहे.

दरम्यान, मान्सूनचा वेग पाहता तामिळनाडू आणि केरळमध्ये 01 जून ते 05 जून दरम्यान मान्सून हजेरी (Weather Update) लागू शकते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 10 जून पर्यंत मान्सूनची येऊ शकतो. तर मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 जून पासून मान्सूनला सुरुवात होईल.

महत्वाच्या बातम्या