Odisha Train Accident | भुवनेश्वर: ओडिसा राज्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाला. तीन ट्रेनच्या झालेल्या या अपघातामध्ये आतापर्यंत 200 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर (Odisha Train Accident) व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मृतदेहांमध्ये कोणाचा तरी शोध घेताना दिसत आहे. ही व्यक्ती प्रत्येक मृतदेहाचा चेहरा उघडून पुन्हा बंद करताना दिसली आहे. रात्रभर ही व्यक्ती तेच काम करत होती. व्यक्तीची विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले, मी या ढिगार्यामध्ये माझ्या मुलाला शोधत आहे.
There was a huge explosion and the train crashed
या 53 वर्षीय व्यक्तीचे नाव रवींद्र शॉ आहे. ही सर्व घटना (Odisha Train Accident) सांगत असताना त्यांचे अश्रू अनावर झाले होते. मी आणि माझा मुलगा कर्ज फेडण्याबाबत चर्चा करत होतो. तेव्हा अचानक एक मोठा धमाका झाला आणि रेल्वेचा अपघात झाला. त्यानंतर बराच वेळ मी भानावर नव्हतो, असं रवींद्र शॉ यांनी सांगितलं
A speechless father trying to find her Son's body😭😭. Pray for their families😭.#TrainAccident #train_accident #TrainCrash #odisha #OdishaTrainAccident #OdishaTrainTragedy #CoromandalExpress #Coromandel #accident #resign #IndianRailways @ANI @AshwiniVaishnaw @PTI_News pic.twitter.com/VneU05h5F1
— Pulkit Sharma (@_Pradhyumn_) June 3, 2023
पुढे बोलताना ते म्हणाले, “शुद्धीवर आल्यानंतर सर्वत्र आजूबाजूला मृतदेह (Odisha Train Accident) आणि मृतदेहांचे तुकडे दिसत होते. त्यामध्ये मी माझ्या मुलाचा शोध घ्यायला सुरू केला. तिथे मला मुलगा सापडला नाही म्हणून मी मध्यरात्रीपर्यंत मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी मुलाला शोधत होतो.”
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
- Ajit Pawar Vs Sanjay Raut | पवार-राऊत भिडले; अजित पवार म्हणाले बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं…”
- Dr. Tatyarao Lahane | जे जे हॉस्पिटल आणि आमचं नातं संपलं – डॉ. तात्याराव लहाने
- Sanjay Raut | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची टीका नेमकी कुणावर?
- Gautami Patil | आडनावाप्रमाणे नावातही घोळ! गौतमीच ‘हे’ आहे खरं नाव