Pankaja Munde | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

Pankaja Munde | बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मी भाजपची आहे. मात्र, भाजप पक्ष माझा नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. यामध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे.

Pankaja Munde will meet Eknath Khadse

पंकजा मुंडे (Pankaja Munde) राष्ट्रवादीत प्रवेश करणार, या चर्चा सुरू असताना मोठी अपडेट समोर आली आहे. पंकजा मुंडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पंकजांच्या (Pankaja Munde) नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याचे तर्क-वितर्क देखील राजकीय वर्तुळात लावले जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारणात काहीतरी नवीन घडामोडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे जनतेला संबोधित करणार आहे. पंकजा मुंडे यावेळी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या