Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Pankaja Munde | बीड: आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) गोपीनाथ गडावर गेले होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली.

Pankaja Munde met Eknath Khadse

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात आज तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

A program was organized for those who loved Gopinath Munde

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “या कार्यक्रमासाठी मी कोणत्याही राजकारण्याला आमंत्रण दिलं नव्हतं. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी फक्त भजन कीर्तनासह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

“एकनाथ खडसे यांचं गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम होतं. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना गोपीनाथ गडावर येण्याचा अधिकार आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडेंचे सहकारी होते. त्या नात्याने ते गडावर दर्शनासाठी आले होते’, असही त्या (Pankaja Munde) यावेळी म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या (Pankaja Munde) म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे यांचा आयुष्य खूप खडतर आणि वादळी होतं. या वादळाची मी मुलगी आहे. इथे खूप मोठे वादळ येणार होतं. मात्र, त्याने दिशा बदलली आणि आमचा आयुष्य पालटलं.”

महत्वाच्या बातम्या