Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

Sanjay Raut Vs Dada Bhuse | नाशिक: गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धार्मिक वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी संजय राऊत आणि दादा भुसे आमने-सामने आले होते.

Dada Bhuse took a step back

त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावरील महिरवाणी गावात संजय राऊत (Sanjay Raut) आणि दादा भुसे (Dada Bhuse) एकच वेळी पालखीच्या दर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी दादा भुसे ज्या दरवाजाने बाहेर पडत होते, त्याच दरवाजाने संजय राऊत आतमध्ये आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या-आपल्या नेत्याच्या नावाच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर वादावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “त्र्यंबकेश्वर मंदिरात अत्यंत शांतता आहे. या प्राचीन वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “त्र्यंबकेश्वर हे एक ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वातावरण, मंदिर, प्रथा-परंपरा खराब करू नका.”

महत्वाच्या बातम्या