WTC Final | WTC फायनल पूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत भर! संघातील ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखाप्रतग्रस्त

WTC Final | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ जोरदार सराव करताना दिसत आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया (Team India) ला मोठा झटका बसला आहे.

Ishan Kishan is injured

टीम इंडियातील महत्त्वाचा खेळाडू इशान किशन (Ishan Kishan) दुखापतग्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. झी न्यूज हिंदी यांनी दिलेल्या वृत्तानुसार, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सराव करत असताना जखमी झाला आहे. त्याच्या या दुखापतीनंतर भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान, इशान किशनच्या जखमेबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही मात्र, त्याची दुखापत जर खरच गंभीर असेल तर टीम इंडियाच्या (WTC Final) चिंतेत नक्कीच भर पडणार आहे.

दरम्यान, हा सामना (WTC Final) पावसामुळे रद्द झाला किंवा टाय झाला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ संयुक्त विजेते ठरणार आहेत. विजेत्या संघाला मिळणारी रक्कम दोन्ही संघांमध्ये विभागून घेतली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला तब्बल 13 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या

Back to top button