Cabinet Expansion | शिवसेना वर्धापन दिनाच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

Cabinet Expansion | मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रीमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा सुरू आहे. अशात याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना वर्धापन दिनाच्याआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यांच्या या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

Shivsena foundation day is on 19 June 2023

शिवसेना वर्धापन दिन 19 जून रोजी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत (Cabinet Expansion) देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेना वर्धापन दिनाच्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करायला पाहिजे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) केला जाणार आहे. यामध्ये शिंदे गटातील दोन खासदारांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महिला आमदारांना देखील यामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) जास्त तारखा झाल्या असल्याचं, बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या